कार्य
१) बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे,
२) शेतकर्यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे,
३) शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.
४) बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे,
५) शेतकर्यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे,
६) विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे,
७) शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे,
८) शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्यांना उत्तेजित करणे,
९) आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञप्ति देणे, अनुज्ञप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ. व
१०) बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञप्तिधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.