समितीबद्दल

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१/०५/१९५७ रोजी केली व भात, तांदळाचे नियमन करून बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्तितीत कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र कल्याण महसूल तालुका असून कार्यक्षेत्रात १२१ गावांचा तसेच कल्याण आणि डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.

बाजार समितीची स्थापना सन १९५७ साली झाली असली तरी प्रत्यक्षात कामकाज सन १९८२ पासून सुरु आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून कार्यक्षेत्र मधून मुंबई-अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग जात असून मुंबई-नाशिक व मुंबई- पुणे हे देखील महामार्ग लागून आहेत तसेच मुंबई-नाशिक व मुंबई- पुणे हे लोहमार्ग देखील बाजार समितीचे कार्यक्षेत्रामधून जात आहेत.

बाजार समितीचे कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु असून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून प्रसिद्ध असे टिटवाळा गणपती मंदिर, विठ्ठलाचे देवस्थान असलेले शहाड येथील बिर्ला मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर तसेच एैत्तेहासिक असा दुर्गाडी किल्ला स्थित आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये भौतिक व सामाजिक सुविधा उत्तम आहेत.

महत्वाच्या व्यक्ती

  • मा. श्री. कपिल विष्णू थळे
    सभापती

  • मा. श्री. प्रकाश श्रीपत भोईर
    उपसभापती

  • मा. श्री. शामकांत रामचंद्र चौधरी
    सचिव


image1
image1
image1

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.