उपक्रम/ योजना



राज्यात कृषि विभागाच्या २९ माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत. त्याचबरोबर कृषि विद्यापीठे - ४, कृषि विज्ञान केंद्र - २६, सहकारी संस्था - १६, खत कंपन्या - ६, व खाजगी - ४०, असे एकूण - १२१ प्रयोगशाळा आहेत. शासनाच्या प्रयोगशाळांमध्ये शेतकर्यांना माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध असून त्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

अ. क्र. नमुना प्रकार परीक्षण शुल्क (रुपये)
सर्वसाधारण माती नमुना १५.००
सूक्ष्म मुलद्रव्य तपासणी २००.००
पाणी तपासणी १०.००

कृषि पणन मंडळाच्या योजना


  • या योजनेत फक्त शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो
  • सदरची योजना हि बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून या योजनेमध्ये तूर, सोयाबीन,मुग, उडीद, चना, भात (धान), सुर्यफुल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा तसेच हळद या शेतमालाचा समावेश.
  • तूर, सोयाबीन,मुग, उडीद, चना, भात (धान), सुर्यफुल, करडई, व हळद हा शेतीमाल कृषि उत्पन्न बाजार समिती गोदामामध्ये ठेवल्यानंतर ज्या दिवशी हा माल बाजार समितीच्या ताब्यात दिला त्या दिवसाच्या बाजारभावाच्या एकूण किमतीच्या कमाल ७५% दराने ठेवण्यात आलेल्या मालाच्या होणाऱ्या किमतीनुसार रक्कम शेतकऱ्याला तात्काळ अदा.
  • ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ५०% अथवा रू.५००/- पार्टी क्विंटल या पैकी कमी असणारी रक्कम ६% व्याज दराने शेतकऱ्यांना अदा.
  • काजू बी करीता बाजारभावाच्या ७५% रक्कम, जास्तीत जास्त रू. ५०/- प्रती किलो एवढी रक्कम शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अदा.
  • बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृह आवश्यक, बेदाणा तारण योजनेत प्रचलित बाजार भावाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रू. ५०,०००/- प्रती टन यापैकी असणारी रक्कम शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अदा.
  • शेतमाल तारण प्रतीपुर्वीच्या रकमेवर ६% दराने व्याज आकारणी.
  • वरील शेतमाल १८० दिवसांकरिता ठेवू शकतो.
  • शीतगृह भाड्याचा खर्च हा शेतकऱ्यांनी करावयाचा
  • वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, कृषि पदवीधर, भागीदारी/ मालकी हक्क, फर्म, स्वयंसाहाय्यता गट, कंपन्या, सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि प्रक्रिया महामंडळ, वखार महामंडळ इ.ना या योजनेचा लाभ.
  • योजनेमध्ये गोदाम हे महानगरपालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर उभारणे आवश्यक.
  • गोदामाची क्षमता किमान १०० मे. टन ते जास्तीत जास्त ३०,००० मे. टनापर्यंत.
  • अनुदान नाबार्ड मार्फत कर्ज वितरीत करणाऱ्या बँके मार्फतलाभार्थास प्राप्त.
  • उत्तर-पूर्वेकडील राज्य, डोंगरी भाग, महिला तसेच स्वयंसहायता गट, त्यांच्या सहकारी संस्था अनुसूचित जाती/ जमाती प्रस्तावधारक व त्यांचे स्वयंसहायता गट, त्यांच्या सहकारी संस्था यांना प्रकल्प खर्चाच्या ३३.३३ टक्के अनुदान.
  • शेतकरी व त्यांचे गट, संस्था,कृषि पदवीधर, सहकारी आणि केंद्रीय/ राज्य वखार महामंडळ इ. ना प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के अनुदान. वरील व्यतिरिक्त इतर प्रस्तावधारक, महामंडळे इ. ना प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के अनुदान.
  • योजनेमध्ये १ हजार मे. टन क्षमतेपर्यंत गोदामांचा उभारणी खर्च ३,५००/- प्रती मे. टन साठवणूक क्षमता असा गृहीत धरलेला असून याच्या २५ टक्के साठवणूक क्षमतेनुसार अनुदान देय होते.
  • १ हजार मे. टनापेक्षा जास्त क्षमतेच्या गोदामांचा उभारणी खर्च ३,०००/- प्रती मे. टन क्षमता गृहीत धरून त्याच्या २५ टक्के साठवणूक क्षमतेनुसार अनुदान

लाभार्थी

  • अ) फळे उत्पादक - द्राक्ष, आंबा, डाळिंब, संत्रा, चिकू, आवळा, सीताफळ, पपई, पेरू, स्ट्रॉबेरी
  • ब) भाजीपाला उत्पादक शेतकरी - टोमाटो, वांगी, कांदा, काकडी इत्यादी

निकष -

  • २ हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी फळबाग/ भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त ५० क्रेट साठी ५० टक्के अधिकतम रक्कम रू.५,०००/- अनुदान देय.
  • २ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त फळबाग/ भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त १०० क्रेट साठी ५० टक्के अधिकतम रक्कम रू. १०,०००/० अनुदान देय.
  • अनुदानाची रक्कमशेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जामध्ये त्यांच्या बँकेचा कहेत क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा एम. आय.सी.आर. अथवा आय.एफ.एस. कोड नमूद करावा.

आवश्यक कागदपत्रे -

  • नमुन्यातील मागणी अर्ज७/१२ चा उतारा (फळे किंवा भाजीपाला यांच्या नोंदीसह)
  • रेशन कार्डची झेरोक्स प्रतपूर्ण भरलेला अर्ज बाजार समितीकडे सदर करावा.
  • अर्जासोबत बाजार समितीस प्रक्रिय शुल्क रु. ५०/- जमा करावे.
  • शेतकऱ्यास क्रेटस अनुदानासाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात येईल.
  • तत्त्वतः मंजुरी नंतर शेतकऱ्याने ISI मार्क असलेल्या क्रेटस खरेदी करून त्याची रक्कम भरल्याचे CST/ BST/ VAT सह मूळ पावतीची प्रत व नमुन्यातील हमीपत्र जोडून बाजार समितीस दयावी.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.